येथील बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. या संपचा आज तेरावा दिवस असून सरकारने अद्यापही मागणी मान्य न केल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन सरकारचा तेरावा घालला. तसेच सरकारच्या नावाने बोंब ठोकून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
पुसेगाव, ता. खटाव येथे विकास जाधव व गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.
महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.
पोलिसांनी नो पार्किंग मधील गाडी उचलल्यानंतर वाहन मालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. एक व्यक्ती पिस्तुलासह वाहतूक शाखेत शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. हि घटना रविवार दि. २१ रोजी सायंकाळी घडली आहे. गणेश हणमंत देवरे (वय २६ वर्षे) रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा आणि विकास प्रल्हाद देवरे (वय २६ वर्षे ) रा. दहिवडी, पोस्ट आंबवडे, ता. सातारा अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने सांगली- मिरज मार्गावर एसटी बसेस धावल्या. शहरी वाहतूकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. बस रोखून दाखवा जशास तसे उत्तर देवू, असे आव्हान पदाधिकाऱ्यांनी केले.
बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि खिल्लार बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. सद्यस्थितीत राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संविधान आणि घटनेचा आदर करून तसेच कायद्याच्या चौकटीत राहून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (वय ३८ वर्ष) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना शनिवार दि. २० रोजी सकाळी ७ वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे.
सोनी मराठी वाहिनीवर येत्या दि. २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा अशी टॅगलाइन हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करते आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत.
आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन पुन्हा कोणत्याही व्यावसायिकासोबत अशा घटना घडू नयेत, त्यादृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
ललगुण, ता.खटाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अभय जाकीर काळे (वय 19, रा. मोळ, ता. खटाव) याला पुसेगाव पोलिसांनी बुध येथे सापळा रचून पाठलाग करून ताब्यात घेतले.