maharashtra

जबरी चोरीचा प्रयत्न करणार्‍या फायनान्स कंपनीच्या दुकलीवर गुन्हा


Crime on the part of a finance company trying to commit robbery
फायनान्स वर घेतलेल्या टिव्हीची वसूली करण्यासाठी आलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन गुंडांनी घरात घुसून टिव्ही तसेच इतर साहित्य पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील महिलांनी तसेच इतर युवकांनी याला विरोध केला असता त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी गावकरी एकवटल्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या दुकलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : फायनान्स वर घेतलेल्या टिव्हीची वसूली करण्यासाठी आलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन गुंडांनी घरात घुसून टिव्ही तसेच इतर साहित्य पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील महिलांनी तसेच इतर युवकांनी याला विरोध केला असता त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी गावकरी एकवटल्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या दुकलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आज दि. 22 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मांडवखडक, ता. फलटण येथील एका युवकाने बजाज फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर टिव्ही घेतलेला आहे. या टिव्हीचा एकच हप्ता बाकी होता. असे असतानाही बजाज फायनान्स कंपनीचे दोन गुंड कोणतीही पूर्वसूचना न देता त्या युवकाच्या घरात घुसले. त्यांनी भिंतीवर लावलेला टिव्ही तसेच घरातील इतर साहित्य उचलण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरातील लोकांनी ज्याने टिव्ही घेतलाय, तो वैद्यकीय उपचारासाठी परगावी गेला आहे, तो आल्यानंतर तुम्ही चर्चा करा आणि त्यानंतरच टिव्ही नेण्याचा निर्णय घ्या, असे सांगितले. परंतू बजाज कंपनीच्या त्या गुंडांनी काहीही न ऐकता अनाधिकाराने दुसर्‍याच्या घरात घुसून टिव्ही तसेच इतर वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील महिला व काही युवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या गुंडांनी त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी सुरु असलेल्या प्रकारामुळे गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे घाबरुन बजाज फायनान्स कंपनीच्या गुंडांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. याप्रकरणी पंकज राजेंद्र निकाळजे (वय 24) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मयुर काकडे व सागर अहिवळे (दोघेही रा. फलटण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून याबाबत अधिक तपास स.फौ. राऊत करीत आहेत.