सातारा तालुक्यातील पाटखळ येथे घरफोडीची घटना घडली असून या घरफोडीत सुमारे 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील पाटखळ येथे घरफोडीची घटना घडली असून या घरफोडीत सुमारे 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.
पाटखळ येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातून रोख 15 हजार रुपये. 70 हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, 15 हजार रुपयांची सोन्याची ठुशी, 17 हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा सुमारे 1 लाख 20 रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी दीपक राजेंद्र जाधव (वय 29, रा.पाटखळ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


