सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या नावाखाली मध्यवर्ती बँक निवडणुक झाली. या निवडणूकीमध्ये सातार्यात वर्चंस्व कोणाचे थोरल्या पवारांचं?, धाकल्याचं?, की रामराजेचं? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा
सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या नावाखाली मध्यवर्ती बँक निवडणुक झाली. या निवडणूकीमध्ये सातार्यात वर्चंस्व कोणाचे थोरल्या पवारांचं?, धाकल्याचं?, की रामराजेचं? हा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेचा निकाल लागला आणि थोरल्या पवार साहेबांनी मूक्काम स्थळ बदलून सातार्यात तळ ठोकला. थोरल्या पवार साहेबांना दैवत मानणार्या तगड्या शिलेदालाच दूसर्यानदा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत विश्रामगृहाच्या ‘अजिंक्यतारा' सूटचा दरवाजा बंदच ठेवून सगळी खलबते होतानाचे चित्र खूप दिवसांनी सातार्याला पाहिला मिळाले.
देशातील पहिल्या क्रमांकावरील असणाऱया बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात दोन विरोधक व एक स्वपक्षीय निवडून येत 19-2 असे बलाबल राहिले. पण जिंकलेले नक्णाकी पॅनेल कोणाचे हा मुद्दा नविन मूद्दा उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी जिंकली का तहात हरली हि द्विधा परिस्थिती निर्माण झाली त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुक्काम चे ठिकाणात बदल करुन साताऱयात मुक्काम केला. त्यामुळे संध्याकाळपर्यंत चाललेल्या विजयी मिरवणुका थांबवून सगळे उमेदवार पवारांकडे धावले. यात विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आदींचा समावेश होता.
आदेश डावलल्याचं दुःख
बालेकिल्ल्यात आज झालेला मुक्काम हा खुद्द शरद पवारांच्या जिव्हारी लागला. त्यांचा आदेश डावलला गेल्याची भावना त्यांच्या या मुक्कामात स्पष्टपणे जाणवली. कारण ‘अजिंक्यतारा' कक्षात उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत पराभूत उमेदवार शशिकांत शिंदे, पॅनेलप्रमुख रामराजे नाईक निंबाळकर , पालकमंत्री बाळासाहेब पाटील , खासदार श्रीनिवास पाटील यांचीच उपस्थिती होती. याबाबत शिवेंद्रराजे भोसले किंवा मकरंद पाटील यांच्याशी काही चर्चा, संवाद किंवा फोनाफोनी झाल्याचे कळले नाही, का पवारांनी लक्षपुर्वक मिडियापुढे ते स्पष्ट केले नाही.


