भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पोवई नाका येथील सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याची अनोखी स्पर्धा कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 'राजधानी सातारा सेल्फी महोत्सव' या अनोख्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.
सर्व नियम सर्वसामान्य जनतेसच का? अशा प्रश्न नागरिकांना पडला असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा नाहीत पण नो - पार्किंग मधील वाहने उचलणेसाठी टोविंग व्हॅन आहेत. जेथे पॅर्जिंगचे आरक्षण आहे तिथे धनदांडगे, राजकारणी लोकांनी अनौपचारिक ताबा मारला असलेमुळे तिथे वाहने पार्किंग होऊ शकत नाही परिणामी सदरची वाहने जागा मिळेल तिथे पार्क होतात
मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
आपल्या आईसह कारमधून नाशिकला निघालेल्या माण तालुक्यातील थदाळे गावच्या मायलेकरांचा मंगळवारी सकाळी शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील घाटात कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे थदाळे गावावर शोककळा पसरली ही घटना समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी नातेपुते पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. 400 फूट खोल दरीत कार खाली कोसळल्याने या मायलेकरांना मृत्यूस सामोरे जावे लागले. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75, दोघेही रा. थदाळे, ता. माण, सध्या रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.
जावली तालुक्यातील गडी येथील मित्राकडे आलेल्या धारदेव, ता. महाबळेश्वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास माऊंटन व्हिला रो हाऊस येथे रात्रीच्या वेळेस अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम मालुसरे नावाच्या व्यक्तीसह अन्य तीन अनोळखींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा येथील गोडोली उपनगरातील आनंदनगरात असणाऱ्या अस्मिता बंगल्यातून ३0 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचीतक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वाहन संवर्गातील नव्या वाहतूक दंडाच्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळण्यात यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कराड तालुका रिक्षा मालक-चालक संघटनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेकडून मंगळवार दि. १५ रोजी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर असलेले विमानतळ लहान व विनापरवाना आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि छोट्या खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे 15 ते 20 विमाने याठिकाणी येत असतात. मात्र, या विमानतळामुळे आजूबाजूच्या 20 किमी अंतरातील परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या रुपाली दशरथ कर्णे हिने युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत देशात पाचवा क्रमांक तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. अत्यंत हालाखिची परिस्थिती असलेल्या व माध्यमिक शाळेतील शिपायाच्या या सुकन्येने हे अभूतपूर्व यश मिळवून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांपूढे आदर्श निर्माण केला आहे. रुपालीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निवडणूक कालावधीत अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. 20 डिसेंबर मतदानाच्या अगोदरचा दिवस व 21 डिसेंबर मतदानाच्या दिवशी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्र दि. 22 डिसेंबर मतमोजणीच्या दिवशी सायं. 5 वा. पर्यंत संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात या कालावधीत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावयाची आहे.