महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

वाहतुकीचे नियम सर्वसामान्यांनाच का?

सर्व नियम सर्वसामान्य जनतेसच  का? अशा प्रश्न नागरिकांना पडला असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा नाहीत पण नो - पार्किंग मधील वाहने उचलणेसाठी टोविंग व्हॅन आहेत. जेथे पॅर्जिंगचे आरक्षण आहे तिथे धनदांडगे, राजकारणी लोकांनी अनौपचारिक ताबा मारला असलेमुळे तिथे वाहने पार्किंग होऊ शकत नाही परिणामी सदरची वाहने जागा मिळेल तिथे पार्क होतात

esahas.com
महाराष्ट्र

मलकापूर फाट्यावर एका तरुणाला भोकसले

मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. 

esahas.com
महाराष्ट्र

शिंगणापूर घाटात कार दरीत कार कोसळून मायलेकरांचा मृत्यू

आपल्या आईसह कारमधून नाशिकला निघालेल्या माण तालुक्यातील थदाळे गावच्या मायलेकरांचा मंगळवारी सकाळी शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील घाटात कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे थदाळे गावावर शोककळा पसरली ही घटना समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी नातेपुते पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. 400 फूट खोल दरीत कार खाली कोसळल्याने या मायलेकरांना मृत्यूस सामोरे जावे लागले. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75, दोघेही रा. थदाळे, ता. माण, सध्या रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

महाबळेश्‍वरमधील हॉटेल व्यावसायिकास मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

जावली तालुक्यातील गडी येथील मित्राकडे आलेल्या धारदेव, ता. महाबळेश्‍वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास माऊंटन व्हिला रो हाऊस येथे रात्रीच्या वेळेस अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम मालुसरे नावाच्या व्यक्तीसह अन्य तीन अनोळखींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

तीस हजारांची घरफोडी

सातारा येथील गोडोली उपनगरातील आनंदनगरात असणाऱ्या अस्मिता बंगल्यातून ३0 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचीतक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वाहन संवर्गातील नव्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळा

वाहन संवर्गातील नव्या वाहतूक दंडाच्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळण्यात यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कराड तालुका रिक्षा मालक-चालक संघटनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेकडून मंगळवार दि. १५ रोजी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

कराड विमानतळ परिसरातील निर्बंध हटवून स्थानिकांना दिलासा द्या

कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर असलेले विमानतळ लहान व विनापरवाना आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि छोट्या खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे 15 ते 20 विमाने याठिकाणी येत असतात. मात्र, या विमानतळामुळे आजूबाजूच्या 20 किमी अंतरातील परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

डिस्कळची सुकन्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत देशात पाचवी तर राज्यात पहिली

डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या रुपाली दशरथ कर्णे हिने युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत देशात पाचवा क्रमांक तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. अत्यंत हालाखिची परिस्थिती असलेल्या व माध्यमिक शाळेतील शिपायाच्या या सुकन्येने हे अभूतपूर्व यश मिळवून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांपूढे आदर्श निर्माण केला आहे. रुपालीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

निवडणुका असलेल्या क्षेत्रात तीन दिवस मद्य विक्री बंद

निवडणूक कालावधीत अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  दि. 20 डिसेंबर  मतदानाच्या अगोदरचा दिवस व 21 डिसेंबर मतदानाच्या दिवशी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्र दि. 22 डिसेंबर मतमोजणीच्या दिवशी सायं. 5 वा. पर्यंत संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात या कालावधीत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावयाची आहे.

esahas.com
महाराष्ट्र

'मी नागरिक' फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : दिलीप पाटील

‘मी नागरिक’ फाऊंडेशन, कराडने आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी यापुढेही यशस्वी घोडदौड सुरू ठेवावी, असे प्रतिपादन दिलीप पाटील यांनी केले.