maharashtra

जिल्ह्यात चौतीस लाख नागरिकांनी घेतली लस

20 लाखांवर नागरिकांनी घेतला पहिला डोस : 13 लाखांवर नागरिकांनी घेतला दुसरा डोस

Thirty four lakh citizens have been vaccinated in the district
कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 34 लाख 68 हजार 898 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

सातारा : कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 34 लाख 68 हजार 898 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
जिल्ह्यात एकूण 22 लाख 79 हजार 500 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 20 लाख 88 हजार 390 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 13 लाख 80 हजार 508 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याने लस घेणाऱ्या एकूण नागरिकांची संख्या 34 लाखा 68 हजार 898 एवढी दिलासादायक झालेली आहे.
यामध्ये 17 लाख 39 हजार 970 पुरुषांनी तर 17 लाख 28 हजार 324 महिलांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. 60 वर्षांवरील 7 लाख 61 हजार 869 नागरिकांनी लस घेतलीय तर 18 ते 44 वयोगटात 17 लाख 44 हजार 669 नागरिकांनी लस घेतलेली आहे. 45 ते 60 वयोगटातील 9 लाख 62 हजार 330 नागरिकांनी लस घेतलेली आहे.

90 टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस
जिल्ह्याला एकूण लसीकरणाचे उद्दिष्ट 22 लाख 79 हजार 500 एवढे असून आजमितीस 20 लाख 88 हजार 390 नागरिकांनी लस घेतल्याने पहिल्या डोसचे लसीकरण 90 टक्के पूर्ण झालेले आहे. तर दुसऱ्या डोसचे लसीकरण 60 टक्के पूर्ण झाले असून 13 लाख 80 हजार 508 नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण घेतलेले आहेत. अद्याप 9 लाख 58 हजार 235 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. मात्र, गत 15 ते 20 दिवसात लसीकरणाचा वेग चांगला वाढला आहे.

31 लाखांवर नागरिकांना कोव्हिशिल्ड
जिल्ह्यात आरंभापासून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली असून एकूण लसीकरणात 31 लाख 37 हजार 913 नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतलेली आहे. तर 3 लाख 22 हजार 506 नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतलेली आहे. कोव्हॅक्सिनचा मध्यंतरी तुटवडा होता त्यामुळे कोव्हिशिल्स लस उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर कोव्हिशिल्ड लसीचा वापर करण्यात आला आहे.

23 लाख 35 हजार 187 नमुने तपासले
जिल्ह्यात गत दीड वर्षांच्या कालावधीत एकूण 23 लाख 35 हजार 187 जणांची कोरोना टेस्टिंग करण्यात आलेली आहे. यापैकी 2 लाख 52 हजार 226 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी 2 लाख 44 हजार 745 जण कोरोनामुक्त होवून बरे झाले आहेत. तर 6 हजार 484 जणांचा मृत्यू झाला आहे.