स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत नागनाथवाडी प्रथम
खटाव तालुक्यात अव्वल; मूलभूत सुविधांना दिले प्राधान्य
स्मार्ट व्हिलेज' स्पर्धेत खटाव तालुकास्तरावर सर्वाधिक गुण मिळवत नागनाथवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे पारितोषिक पटकावले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शासनाची ही स्मार्ट व्हिलेज योजना आहे. नागनाथवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचा सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
पुसेगाव : स्मार्ट व्हिलेज' स्पर्धेत खटाव तालुकास्तरावर सर्वाधिक गुण मिळवत नागनाथवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे पारितोषिक पटकावले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शासनाची ही स्मार्ट व्हिलेज योजना आहे. नागनाथवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचा सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अर्चना वाघमळे यांच्या हस्ते स्मार्ट व्हिलेज स्पर्धेमध्ये नागनाथवाडी ग्रामपंचायतीने खटाव तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. नागनाथवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली फडतरे, उपसरपंच संतोष घाडगे, ग्रामसेविका मीना मुळीक, शिवाजी फडतरे, गोरख गुरव, नंदकुमार खापे, प्रवीण घाडगे, विमल घाडगे, सुनिता फडतरे, विजया खापे, संजय गुरव व गणेश फडतरे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
नागनाथवाडी ग्रामपंचातीने बीड जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे व माजी सरपंच छाया ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक शौचालय सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, बचत गट, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली, पाणी पुरवठा व दिवाबत्तीसाठी वापरलेले वीजबिल नियमित भरणे, महिला व बालकल्याण अंपगावरील खर्च, सौर पथ दिवे, बायोगॅस सयंत्राचा वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, ग्रामपंचायतींमध्ये संगणकाचा वापर यासारख्या विकासकामे करण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून नागनाथवाडी ग्रामपंचायतीची तापसणी करण्यात आली होती. यामध्ये शंभर गुण होते. नागनाथवाडीने सर्वाधिक गुण मिळवित तालुकास्तरावर बाजी मारली आहे.
या यशाबद्दल आ. शशिकांत शिंदे, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, ठाणे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे, जि प. सदस्या सुनिता कचरे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, पं. स. सदस्य कैलास घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.