maharashtra

युवकाचा ट्रॅकटर पलटी झाल्याने मृत्यू


Youth dies after overturning tractor
वाई तालुक्यातील बावधन येथील दिनेश चंद्रकांत नायकवडी (वय ३६) या युवकाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

सातारा : वाई तालुक्यातील बावधन येथील दिनेश चंद्रकांत नायकवडी (वय ३६) या युवकाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दिनेश हा ट्रॅक्टर (एमएच ११ - डीए १४२) घेवून झरा नावाच्या शिवारात गेला होता. यावेळी ओढ्यातून जात असताना ट्रॅक्टर पलटी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर सचिन भिकाजी ननावरे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास हवालदार वरखडे करत आहेत.