वाई येथील मानेनगर, सोनगिरवाडी येथील शकील खुदबूद्दीन बागवान (वय ५0) यांनी सोमवार, दि. १३ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
सातारा : वाई येथील मानेनगर, सोनगिरवाडी येथील शकील खुदबूद्दीन बागवान (वय ५0) यांनी सोमवार, दि. १३ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शकील बागवान यांनी घराशेजारी असलेल्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर जमीर खुदब्बूद्दीन बागवान यांनी वाई पोलीस ठाण्यात दिल्यानतंर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक गहीन करत आहेत.


