maharashtra

एकाची आत्महत्या


सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे येथील अशोक विष्णू भोसले (वय ६0) या वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार, दि. १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

सातारा  : सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे येथील अशोक विष्णू भोसले (वय ६0) या वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार, दि. १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, अशोक भोसले यांनी कॅनॉल शेजारील बामणकी नावाच्या शिवारात असणाऱ्या आंब्याच्या झाडास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर आशिष अशोक भोसले यांनी दिल्यानंतर त्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हवालदार दबडे हे करत आहेत.