maharashtra

मलकापूर फाट्यावर एका तरुणाला भोकसले

पाचही हल्लेखोर फरार

A young man was stabbed at Malkapur fork
मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लहान मुलांच्या कारणावरून मंगळवारी रात्री वादावादी व भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मलकापूर फाटा येथील सेवा रस्त्यावर पाच जणांनी विश्वास येडगे यांना धारदार शस्त्राने भोसकले आहे. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कराडचे पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह राहूल वरोटे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक  सरोजिनी पाटील व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला .