maharashtra

तीस हजारांची घरफोडी


Thirty thousand burglary
सातारा येथील गोडोली उपनगरातील आनंदनगरात असणाऱ्या अस्मिता बंगल्यातून ३0 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचीतक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा येथील गोडोली उपनगरातील आनंदनगरात असणाऱ्या अस्मिता बंगल्यातून ३0 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचीतक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब रघुनाथ बनसोडे-माळी (वय ७१, रा. अस्मिता बंगला, आनंदनगर, सर्व्हे नंबर ४१ / १ ब, प्लॉट नंबर ६, एमएसईबी पतसंस्थेजवळ, गोडोली, सातारा) हे सेवानिवृत्त असून त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशानेतरी तोडून बेडरुममधून ३0 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. ८ ऑक्टोबर ते दि. १२ डिसेंबर २0२१ या कालावधीत घडली असून याची तक्रार सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दाखल झाली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालादर भवारी करत आहेत.
दरम्यान, आप्पासाहेब बनसोडे-माळी हे उपचार घेत असल्यामुळे त्यांच्याकडून उशिरा तक्रार दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले