महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा हा कौतुकास्पद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा आज कृतज्ञता गौरव सोहळा वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही कोतुकास्पद बाब आहे. त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

बोंडारवाडी धरणाचा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार : डॉ. भारत पाटणकर

जावली तालुक्यातील केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे. जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने एक वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

कोणी लाच मागितली तर संपर्क साधा ! पूढचे आम्ही बघून घेवू

कुपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार पोलीस निरीक्षक अविनाश जगताप व उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी केला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या विश्वासाहर्तेबाबत शंका निर्माण केल्याचे दिसून येत आहे.  उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी यापूर्वी केलेल्या सापळा कारवायांबाबत जिल्ह्यात दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून केवळ तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गळाला अडकवून मोठे मासे सोडून देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजून एखादी शासकीय यंत्रणा निर्माण करावी का, याबाबत शासनाने नक्की विचार करण्याची वेळ आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोडीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 11 हजार 646 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

गंभीर गुह्यातील नगरातला ‘बाळा’ तडीपार

सातारा जिह्यातून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे तब्बल पाच गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ बाळा काशिनाथ सकट (प्रतापसिंहनगर) याला सातारा जिह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक

वाई तालुक्यातील वेळे येथे भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांना भुईंज पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. काही तासांतच ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

देशी दारु प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा तालुक्यातील जकातवाडी हद्दीत असणाऱ्या बोगदा ते जकातवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांनी देशी दारु जप्त केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खा. शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.  अनेक ठिकाणी व्हर्च्युअल रॅली, सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकारी, मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

esahas.com
महाराष्ट्र

बेलवडेतील अंगणवाडीच्या भिंती झाल्या बोलक्या

बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील अंगणवाडी व लगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर विविध संदेश व चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भिंत बोलकी झाली असून गावाच्या सुशोभीकरणातही भर पडली आहे.  

esahas.com
महाराष्ट्र

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये माणचा बाळू पुकळे प्रथम : महिल गटात मुंबईची मनिषा जोशी प्रथम

स्पर्धेवर यावर्षी परदेशी धावपट्टू नसल्याने स्थानिक धावपट्टूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत खुल्या माणच्या बाळू पुकळे या धावपटूने 1 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. अनिल कोरवी याने 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद दुसरा तर धर्मेंदर कुमार याने 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद तिसरा क्रमांक पटकावला. तर भारतीय महिला गटात मुंबर्इच्या मनिषा जोशी यांनी 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद या वेळेत पहिला क्रमांक पटकावला.