maharashtra

दुचाकी अपघातात शिरंबे येथील एकजण ठार


One died in Shirambe accident
कोरेगाव-एकसळ रस्त्यावर डी. पी. भोसले कॉलेज जवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धनंजय एकनाथ भोसले वय ३५ रा शिरंबे ता. कोरेगाव असे त्यांचे नाव आहे.

कोरेगाव : कोरेगाव-एकसळ रस्त्यावर डी. पी. भोसले कॉलेज जवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धनंजय एकनाथ भोसले वय ३५ रा शिरंबे ता. कोरेगाव असे त्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय भोसले हे एकसळ-कोरेगाव रस्त्यावरून होंडा युनिक्रॉन होंडा एम.एच०२ ए. आर. ४०६२ या वाहनावरून निघाले होते. समोरून कोरेगावकडून पोपट शंकर भोसले हे आपले वाहन हिरो होंडा स्पेल्डर क्र.एम.एच.११ ए.वाय. ८३५२ हे वाहन घेऊन निघाले होते. यांनी बेदरकारपणे वाहन चालवून धनंजय भोसले यांच्या वाहनाला समोरून धडक दिल्याने अपघात होऊन ते या अपघातात मृत्युमुखी पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कृष्णात यशवंत चव्हाण वय ४८ रा शिरबे ता. कोरेगाव यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत.