maharashtra

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरले ५० हजारांचे दागिने


Unidentified thieves broke the lock of a locked house and stole jewelery worth Rs 50,000
खिंडवाडी, ता. सातारा येथील नीलेश नंदकुमार शिंगनापूरकर(वय ३६) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. ११ रोजी मध्यरात्री घडली.

सातारा : खिंडवाडी, ता. सातारा येथील नीलेश नंदकुमार शिंगनापूरकर(वय ३६) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. ११ रोजी मध्यरात्री घडली.
नीलेश शिंगनापूरकर हे साॅफ्वेअर इंजिनीयर आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कुटुंबीयासमवेत बाहेरगावी गेल होते. दुसऱ्या दिवशी दुपारी ते घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिणे आणि रोकड असा सुमारे ५० हजारांचा एेवज चोरून नेला. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, याबाबत अधिक तपास हवालदार शिंदे हे करीत आहेत.