maharashtra

दुचाकीची चोरी


Bike theft
सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कनिष्क हॉल ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल या मार्गावर डाव्या बाजूला असणाऱ्या उद्यानाच्या गेटच्या समोर लावलेली पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली आहे.

सातारा : सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कनिष्क हॉल ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल या मार्गावर डाव्या बाजूला असणाऱ्या उद्यानाच्या गेटच्या समोर लावलेली पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली आहे.
याबाबतची तक्रार कुणाल बाळकृष्ण गायकवाड (वय २२, रा. पळशी स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) या युवकाने याबाबतची तक्रार दिली आहे. ही घटना शनिवार, दि. ११ रोजी रात्री सव्वासात ते अकरा या वेळेत घडली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महिला पोलीस नाईक सपकाळ करत आहेत.