maharashtra

उसने पैसे दिले नाहीत म्हणून मजूरास मारहाण


Beating the laborer for not paying the loan
उसने पैसे दिले नाहीत म्हणून मजूराला मारहाण करणाऱ्या प्रतापसिंहनगरातील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यशवंत ओव्हाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. सातारा शहरातील विसावा नाका परिसरात असणाऱ्या सातारा हॉस्पिटलच्या चौकात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सातारा : उसने पैसे दिले नाहीत म्हणून मजूराला मारहाण करणाऱ्या प्रतापसिंहनगरातील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यशवंत ओव्हाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. सातारा शहरातील विसावा नाका परिसरात असणाऱ्या सातारा हॉस्पिटलच्या चौकात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हर्षद राजू बागवान (वय २८, रा. २७७, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे मजूरी करतात. यशवंत ओव्हाळ (रा. घर नंबर १४५, प्रतापसिंहनगर, सातारा) याने हर्षद यांच्याकडे रविवार, दि. १२ रोजी सायंकाळी पाच वाजता उसने पैसे मागितले. मात्र, हर्षद यांनी यशवंतला उसने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरुन यशवंतने रागाच्या भरात हर्षद यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. याबाबतची तक्रार हर्षद यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर यशवंत ओव्हाळ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर करत आहेत.