maharashtra

चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी कराड नगर अभियंता व उपअभियंता यांना तात्काळ निलंबित करा !

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : मा. सलिम पटेल मा. इम्रान मुल्ला यांची मागणी

Immediately suspend Karad Municipal Engineer and Deputy Engineer in Chimukalya's death case!
चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणी नगर अभियंता व उप अभियंता यांना तातडीने निलंबित करा व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ येथे प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे  मानव कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सलीम पटेल व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. 

        चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणी नगर अभियंता व उप अभियंता यांना तातडीने निलंबित करा व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ येथे प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे  मानव कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सलीम पटेल व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. 
                 याबाबतची सविस्तर माहिती अशी कराड  येथील आंबेडकर पुतळ्याजवळील बुधवार पेठेतील नगरपालिका शाळेजवळ संरक्षण भिंत बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने विराट विजय चव्हाण वय वर्षे चार या चिमुकल्याचा नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. याला नगरपालिकेचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याने कराड नगरपालिकेचे नगर अभियंता व उपअभियंता हे जबाबदार असल्याने त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना निलंबित करावे कारण ठेकेदारा पेक्षा नगर अभियंता व उपअभियंता यांची जबाबदारी मोठी आहे .त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी त्वरित नगर अभियंता ,उपअभियंता यांनी कामात कुचराई व दुर्लक्ष केल्यानेच त्याचा जीव गेला आहे हे लक्षात घेऊन त्यांना त्वरित निलंबित करावे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा .अन्यथा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना  व मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य व 
   राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष  इम्रान  मुल्ला यांचे वतीने देण्यात आलेला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू होते त्यासाठी खड्डे खोदलेले होते ते खोदत  असताना पाण्याची पाईप फुटली दरम्यान संध्याकाळी पाणी सुटलनंतर त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्या ठिकाणी लहान मुले खेळत होती.  
               त्यांच्यासोबत चिरंजीव विराट हा सुद्धा खेळत होता तो अचानक त्या खड्ड्यात पडला व त्याचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी काम चालू आहे. व ते काम अर्धवट राहिले आहे त्या ठिकाणची पाहणी करून नगर अभियंता व उपअभियंता यांनी बॅरिकेट किंवा सेफ्टी अधिकारी नेम ला असता  तर ही दुर्घटना टाळता आली असती एका निष्पाप मुलाचा जीव वाचला असता नगर अभियंता व उपअभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही सूर्यवंशी मळा स्टेडीयम रोड या ठिकाणी नगरपालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून विजय शिंदे नामक एका व्यक्तीचा खड्ड्यात पडून त्याला जीव गमवावा लागला होता त्याच्या कुटुंबालाही अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही तसेच विराटच्या कुटुंबालाही अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही ती शासकीय मदत मिळावी . त्यामुळे आणखी किती जणांचा जीव नगरपालिका घेणार फक्त ठेकेदारावर कारवाई करून नगरपालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.
                        सध्या कराड नगरपालिकेमध्ये "आपण दोघे भाऊ भाऊ जे मिळेल ते वाटून खाऊ" असे काम चालू आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो तरी तातडीने मुख्याधिकारी ,नगराध्यक्ष , यांनी निष्काळजी नगर अभियंता व उपअभियंता यांना निलंबित करून त्यांच्यावर दहा दिवसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा यावेळी मानव कल्याणकारी संघटना व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार  संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे .