maharashtra

अखेर सभापतींनी केली उंब्रज आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांची कान उघडणी


Finally, the speakers opened the ears of the staff of Umbraj Health Primary Center
उंब्रज, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली. तसेच डाटा आँपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठवला गेल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. काल सायंकाळीच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वच आरोग्य केंद्राना याबाबत दक्षता घेण्याचे आदेश काढले.

उंब्रज : लसीकरण करायचे आहे, तर सिरीज विकत आणा. या उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकाराने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिकाऱ्यांनीही गंभीर दखल घेतली आहे. मंगळवार दि 14 रोजी सकाळी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी आरोग्य केंद्राला भेट देवून येथील डाँक्टर व कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली. दरम्यान डाटा एन्ट्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांस लस देण्याचे काम सोपवणाऱ्या त्या महिला कर्मचाऱ्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली. तसेच डाटा आँपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठवला गेल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. काल सायंकाळीच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वच आरोग्य केंद्राना याबाबत दक्षता घेण्याचे आदेश काढले.
याप्रकरणी मंगळवारी सकाळी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता मात्र उपस्थित असणारे अन्य डाँक्टर व कर्मचाऱ्यांची त्यांनी कान उघडणी केली, असे प्रकार पुन्हा घडू नयेत याबाबत सुचना केल्या. दरम्यान या आरोग्य केंद्रात डाटा एन्ट्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांस लस देण्यासारखे जबाबदारीचे काम सोपवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष आहे.