maharashtra

वाहतुकीचे नियम सर्वसामान्यांनाच का?

शासकीय अधिकारी, नेते राजकारणी यांना पायघड्या

Why traffic rules for general public?
सर्व नियम सर्वसामान्य जनतेसच  का? अशा प्रश्न नागरिकांना पडला असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा नाहीत पण नो - पार्किंग मधील वाहने उचलणेसाठी टोविंग व्हॅन आहेत. जेथे पॅर्जिंगचे आरक्षण आहे तिथे धनदांडगे, राजकारणी लोकांनी अनौपचारिक ताबा मारला असलेमुळे तिथे वाहने पार्किंग होऊ शकत नाही परिणामी सदरची वाहने जागा मिळेल तिथे पार्क होतात

शहरातील वाहतूक सुव्यवस्थित, विना वाहतूक कोंडी व्हावी हि जशी वाहतूक पोलिसांची जबाबदारी आहे तशी सर्वसामान्य जनतेची, नागरिकांची पण आहे. नुकत्याच झालेल्या वाहतुकीसंदर्भातील सर्वच दंडाची रक्कम दुपटीपेक्षा करण्यात आली आहे. सर्वाना कायद्याचा धाक पाहिजे हे जाणून जनमाणसानी त्याचे  स्वागत पण केले पण सर्व नियम सर्वसामान्य जनतेसच  का? अशा प्रश्न नागरिकांना पडला असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा नाहीत पण नो - पार्किंग मधील वाहने उचलणेसाठी टोविंग व्हॅन आहेत. जेथे पॅर्जिंगचे आरक्षण आहे तिथे धनदांडगे, राजकारणी लोकांनी अनौपचारिक ताबा मारला असलेमुळे तिथे वाहने पार्किंग होऊ शकत नाही परिणामी सदरची वाहने जागा मिळेल तिथे पार्क होतात आणि त्यामुळे सर्वसामान्याना  मानसिक, आर्थिक अशा दोन्ही मनस्तापाना सामोरे जावे लागत आहे. पण याउलट शासकीय अधिकारी, नेते राजकारणी लोक अशा लोकांची वाहने कोठेही पार्क होतात आणि वाहतूक पोलीस सोईस्कर पद्धतीने त्याकडे कानाडोळा पण करतात. काहीवेळा तर चालक गाडीमध्ये असताना पण नो-पार्किंग ची इ -चलन काराचेही कारनामे वाहतूक पोलीस करताना दिसून आले आहेत. 
        सातारा शहरातील बुधवार पेठ परिसरामध्ये जुन्या गाड्यांचे खरेदी - विक्री करणारे विक्रेते , रिकामे ब्यलर विक्रेतेनी तर रस्त्यावरच उद्योग सुरु केले आहेत पण त्याची वाहने  टोविंग व्हॅन कधी उचलत नाही, शहराचे रस्त्यावरील सर्व पुटपाथ गायब झाले आहेत तिथे टपऱ्या तसेच संबंधीत व्यावसायिकांच्या गाड्यांचे पार्किंग होत आहे त्यावर काहीच कारवाई होत नाही. तर सातारा - कोरेगाव मार्गावरील जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टोरंट परिसरात तर निम्यापेक्षा जास्त रस्ता विक्रेत्यांनी काबीज केला आहे. पोवई नाका  परिसरात एका मोठ्या राजकारणेंनी रस्त्यावरच मंडप मारला आहे मग या सर्वांवर कारवाई का होत नाही का हे सगळे कायदे सर्वसामान्य नागरिकांसाठीच केले आहेत का? 
        वाहतूक पोलिसांना गाडी आडवून कागदपत्रे तपासणे हेच काम आहे का? प्रत्येक टोल नाक्यावर अक्षरशः ट्राफिक पोलसांची फोज तैनात असते यातून शासनास मोठा महसूल पण मिळत आहे पण सर्वांसामन्यांसाठीच हि फौज काम करत असताना दिसून आले आहे. महामार्गावरील स्पीड कंट्रोल व्हॅन मध्ये पण सर्वसामन्य जनतेच्याच गाड्या येतात कधी नेत्याचा ताफा ८० कि.मी. पेक्षा जास्त वेगाने जातो तो कधी चुकून पण येत नाही. रस्ते खराब त्यामुळे संबंधीत ठिकाणी पोहचणेसाठी विलंब होऊ नये म्हणून चांगले रस्त्यावर गाडी स्पीड मध्ये चालते आणि याच गाड्या स्पीड कंट्रोल व्हॅनचे जाळ्यात अडकतात. अशी मोठी दंड कारणेपूर्वी सर्वसामान्याना विश्वस्त घेणे आवश्यक होते असे विचार जनमाणसात उमटायला लागले आहेत.