maharashtra

वाहन संवर्गातील नव्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळा

कराडात रिक्षा चालकांची मागणी : उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

Exclude passenger auto rickshaws from the new rules in the vehicle category
वाहन संवर्गातील नव्या वाहतूक दंडाच्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळण्यात यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कराड तालुका रिक्षा मालक-चालक संघटनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेकडून मंगळवार दि. १५ रोजी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

कराड : वाहन संवर्गातील नव्या वाहतूक दंडाच्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळण्यात यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कराड तालुका रिक्षा मालक-चालक संघटनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेकडून मंगळवार दि. १५ रोजी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी कराड तालुका ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष वसंत देवाडिगा, मकसूद बागवान, सुनिल चक्के, आयुब नदाफ, संजय भिलवडे, धर्मवीर संभाजीराजे ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मुसा शेख, रमजान कागदी, कर्मवीर युनियनचे अध्यक्ष मुराद आगा, यशवंत रिक्षा गेटचे मागाप्पा जमादार, शिवशक्ती रिक्षा गेटचे मामा पवार आदींसह शहर व तालुक्यातील रिक्षा युनियनचे पदाधिकारी, रिक्षा मालक-चालक उपस्थित होते.
कोरोनाच्या टाळेबंदीमुळे ॲटो रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. टाळेबंदी उठली असली तरी अजून म्हणावा असा व्यवसाय मिळत नाही. त्यातच इंधनाचे दर वाढले आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये मोठी स्पर्धा आहे. तुटपूंज्या कमाईमध्येऑटो रिक्षा चालक कसाबसा कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या परिस्थितीत नव्या वाहतूक दंडाने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. भरमसाठ दंडाचा दणका रिक्षा व्यावसायिकांना सोसणारा नाही. त्यामुळे तातडीने या नव्या वाहतूक दंडाच्या वाहन संवर्गातून ऑटो रिक्षांना वगळण्यात यावे. अन्यथा याबाबत राज्यभर आंदोलन छेडावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.