maharashtra

शिंगणापूर घाटात कार दरीत कार कोसळून मायलेकरांचा मृत्यू

मृत माण तालुक्यातील थदाळे गावाचे : नाशिकला जात असताना घडली दुर्घटना

Milekar dies after car crashes in Shingnapur Ghat
आपल्या आईसह कारमधून नाशिकला निघालेल्या माण तालुक्यातील थदाळे गावच्या मायलेकरांचा मंगळवारी सकाळी शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील घाटात कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे थदाळे गावावर शोककळा पसरली ही घटना समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी नातेपुते पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. 400 फूट खोल दरीत कार खाली कोसळल्याने या मायलेकरांना मृत्यूस सामोरे जावे लागले. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75, दोघेही रा. थदाळे, ता. माण, सध्या रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

सातारा : आपल्या आईसह कारमधून नाशिकला निघालेल्या माण तालुक्यातील थदाळे गावच्या मायलेकरांचा मंगळवारी सकाळी शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील घाटात कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे थदाळे गावावर शोककळा पसरली ही घटना समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी नातेपुते पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. 400 फूट खोल दरीत कार खाली कोसळल्याने या मायलेकरांना मृत्यूस सामोरे जावे लागले. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75, दोघेही रा. थदाळे, ता. माण, सध्या रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात मंगळवारी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. या भवानी घाटात फारशी वर्दळ नसल्याने ही घटना लवकर कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही नागरिकांना ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी पिंपरीचे पोलीस पाटील खर्चे यांना ही घटना कळवली. पोलीस पाटील खर्चे यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या व्हॉटसॲप ग्रुपवर ही घटना कळवली. पिंपरीतील 100 ते दीडशे युवक हे तातडीने घटनास्थळी गेले. युवकांच्या मदतीने मानवी साखळी करुन कारमधील जखमींना दरीतून वर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. शिंगणापूरचे पोलीस पाटील देखील ग्रामस्थांसह मदतीसाठी धावून आले होते.  
भवानी घाटात एका अवघड वळणावर कार चालवताना ताबा सुटल्याने 250 ते 300 फूट खोल दरीत कार कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले होते. तर या अपघातात गजानन सर्जेराव वावरे व हिराबाई सर्जेराव वावरे या मायलेकरांचा जागीच अंत झाला होता. ही घटना नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला.  त्यानंतर दोघांचे मृतदेह नातेपुते ग्रामीणा रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेदरम्यान गजानन वावरे यांचे चुलतभाऊ छगन नामदेव वावरे हे पिंपरी, ता. माळशिरस येथे कांद्याची रोप आणण्यासाठी निघाले असताना भवानी घाटात गर्दी दिसल्याने ते थांबले. त्यावेळी एका महिलेचा मृतदेह युवकांनी वर काढला होता. तो पाहताच त्यांनी मृत महिला हिराबाई वावरे या त्यांच्या चुलती असल्याचे ओळखले. त्यामुळे मृतदेहांची ओळख तातडीने पटली.
सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी सोमवारी थदाळे या आपल्या मूळगावी आले होते. मतदान झाल्यानंतर मंगळवारी सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघेजण  कार क्रमांक एम. एच. 15 जी. एल. 9040 मधून नाशिककडे जात होते. पण शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात एका मोठ्या वळणावर कारवरील ताबा सुटून कार 250 ते 300 फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद नातेपुते पोलीस ठाण्यात झाली आहे. घाटात वर्दळ नसल्याने ही घटना उशिरा समजली त्यामुळे मदतकार्यही उशिराच सुरु झाले. पिंपरीतील ग्राम सुरक्षा दलातील युवकांनी तातडीने घटनास्थळी मदत कार्य सुरु केल्याने मृतदेह वर काढण्यात आले. या अपघातात कारचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून याबाबतछगन नामदेव वावरे (वय 50, रा. थदाळे, ता. माण) यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवले याबाबत अधिक तपास करत आहेत.