झुंजार सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारच्या भूमीत लष्कर/सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैदयकिय उपकेंद्र तातडीने सुरु करावे या प्रमुख मागण्यासह विविध प्रश्नांबाबत निर्णय घेणेबाबत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण मंत्री ना.राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली.
विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रस्त्याचे काम चालू असल्यामुळे कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे. त्यातच सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे ऊस वाहतूकसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ऊसाची वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रॉलींच्या पाठीमागे लाईट, रिफलेक्टर नसल्याने मोठे अपघात होत आहेत.
पासपोर्ट काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याला हेलपाटे मारण्याची सुरु असलेली पध्दत साताऱ्यातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वांना साताऱ्यात पासपोर्ट उपलब्ध होवू लागले. मात्र, इतर तालुक्यातून सातारला येणे देखील अनेकवेळा गैरसोयीचे ठरत असते.
कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील महाविद्यालयामध्ये डॉ.भरत जाधव यांनी लिहिलेल्या तौलनिक साहित्याभ्यास : नव्या दिशा या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश एन. देवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी दिली.
निसर्गामध्ये आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार वन्य प्राण्यांना आहे. माणसाला स्वार्थी समजले जाते. इथेही आपला स्वार्थ पहा. आपल्याला निसर्गात जगायचे असेल तर वन्य प्राण्यांनाही जगवा. बिबट्याला दुखवू नका मात्र त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन सातारा तालुका वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचा राज्यासह ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील सैदापूर- गोवारेसह अन्य ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
फलटणमधील अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आलेल्या वाळूमाफियाने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या विरोधात महसूल कर्मचार्यांंनी आज दि. 17 रोजी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
अंगापूर (ता. सातारा) येथील वृद्धेचा काल दुपारी ओढ्याच्या पाण्यात बडुन मृत्यू झाला आहे.
एटीएम कार्डची अदलाबदली करून 40 हजार रुपये परस्पर काढत माजी सैनिकाची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी युवकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे कोडोली येथील एटीएममध्ये तिघांनी वृद्धाचे कार्ड घेऊन 20 हजार रुपये परस्पर काढले आहेत.