maharashtra

फलटण येथे क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलांसह आईला बेदम मारहाण

महिला पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याची मागणी

Mother beaten to death in Phaltan for trivial reasons
फलटण येथे क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन 4 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसह त्यांच्या आईलाही काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या छोट्या बालकांसह त्यांच्या आर्इला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी मारहाण झालेल्या पिडीत महिलेसह फलटण दत्तनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

फलटण : फलटण येथे क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन 4 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसह त्यांच्या आईलाही काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या छोट्या बालकांसह त्यांच्या आर्इला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी मारहाण झालेल्या पिडीत महिलेसह फलटण दत्तनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दि.16 डिसेंबर रोजी फलटण शहरातील दत्तनगर येथे एका घरात लहान मुले व त्याची आई झोपेत होती. त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांनी घरात जाऊन आमच्या घरची झाडे चोरताय काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली. या महिलेने त्यांनी असा काही प्रकार केलेला नाही, असे म्हणताच पोलीस कर्मचारी आगम यांनी त्या अल्पवयीन मुलांबरोबर आईलाही काठीचे वळ उठेपर्यत चोप दिला आहे.
लहान मुलांनी खेळायला आणलेली फुलांची झाडे व कुंडया हे डोक्यावर घेऊन पीडित आई व मुले यांची आगम यांनी घराकडे शिव्याशाप देत वरात काढली. ही घटना घडत असताना अनेक नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त करत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन कायद्याला मोडून काढणारे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका जबाबदार पोलीस कर्मचाऱ्याने बालमनांवर काय परिणाम होतील, याची पर्वा न करता केलेली मारहाण व त्यांची काढलेली वरात घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अर्ज दिला. तसेच त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनाही अर्ज देत परिस्थिती सांगितली.
यावेळी तानाजी बरडे यांनी पोलीस कर्मचारी आगम यांनी केलेला प्रकार हा निंदनीय व चुकीचा आहे. आम्ही कारवाई करु, असे आश्‍वासन दिले. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दखल न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते संजय पवार, अमिरभाई शेख, आरिफ शेख, सैफ़ शेख यांनी सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे जाणार असल्याचे ‘सातारा टुडे ’शी बोलताना सांगितले.