maharashtra

बेलवडे बुद्रुकला पुरोगामी विचारांचा वारसा

डॉ. अतुल भोसले : ३२ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न

Belwade Budruk has a legacy of progressive thinking
बेलवडे बुद्रुक गावावर स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ), स्व. जयवंतराव भोसले (आप्पा), स्व. विलासराव पाटील (काका) यांचे विशेष प्रेम होते. स्व. मोहनराव मोहिते आणि पै. जगन्नाथ मोहिते यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा बेलवडे बुद्रुक गावाला लाभला असून तो असाच पुढे चालू राहील, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांनी केले.

कराड : बेलवडे बुद्रुक गावावर स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ), स्व. जयवंतराव भोसले (आप्पा), स्व. विलासराव पाटील (काका) यांचे विशेष प्रेम होते. स्व. मोहनराव मोहिते आणि पै. जगन्नाथ मोहिते यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा बेलवडे बुद्रुक गावाला लाभला असून तो असाच पुढे चालू राहील, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांनी केले.
डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते बेलवडे बुद्रुक ता. कराड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संपतराव मोहिते होते. पै. जगन्नाथ मोहिते, हर्षवर्धन मोहिते, ॲड. जयवंतराव मोहिते, पांडुरंग मोहिते, पै. संभाजी मोहिते, झुंझार मोहिते, प्रवीण मोहिते, जयवंत कुंभार, ‌ॲड. वसंतराव मोहिते, विक्रमसिंह मोहिते, रुपेश मोहिते, मानसिंग मोहिते, संजय मोहिते, रोहित मोहिते, दिग्विजय मोहिते, सुनीता शिंदे, अलका मोहिते, संगीता भोसले, जैबूनबी मुल्ला, स्वाती मोहिते, सुलोचना पवार, विलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून थेट गावापर्यंत निधी येत आहे. त्यामुळे आज गावे विकासाच्या प्रवाहात येत आहेत. गावातील अडीअडचणी, प्रश्न गावातील लोकप्रतिनिधी सक्षमपणे सोडवत असून बेलवडे बुद्रुक गावच्या विकासासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या निधीतून मंजूर झालेले 20 लाख रुपयांचे नवीन ग्रामपंचायत कार्यालय, 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत निधीमधून मत्तेखान मुल्ला ते सचिन मोहिते यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटर 7 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेच्या पश्चिमेकडील संरक्षण भिंत, समाजकल्याण निधीतून बेघर वस्तीमधील बंदिस्त गटर 5 लाख रुपये आदी. 32 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व नुकत्याच पूर्ण झालेल्या अंगणवाडीच्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांनी प्रास्ताविक केले. तसेच एका वर्षात गावात झालेल्या कामाचे, नवीन संकल्पनांचे प्रगती पुस्तक सादर करून पुढील वर्षीच्या होणाऱ्या कामाचे नियोजन सर्वांसमोर मांडले. ॲड. जयवंतराव मोहिते यांनी मनोगत मांडले. तत्पूर्वी, या कार्यक्रमात लक्ष्मी मोहिते, जगन्नाथ मोहिते, हौसेराव लोकरे, प्रदीप मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

आदर्श गाव बनवण्यासाठी डॉ. सुशांत मोहिते प्रयत्नशील
गावचे युवा, तडफदार, सक्रिय सरपंच डॉ. सुशांत मोहिते हे बेलवडे बुद्रुक गावच्या विकासासाठी वेळ देऊन विविध उपक्रम राबवत आहेत. शासकीय निधी, योजना याचा पाठपुरावा करत आहेत. ते विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामील करून गावचा विकास भक्कम करत आहेत. राज्यातील आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी केलेल्या विकासकामांच्या प्रयत्नासाठी व नियोजनासाठी डॉ. अतुल भोसले सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांचे विशेष कौतुक केले.