पुसेगाव जिल्हा परिषद गटात पाच वर्षात आमदार शशिकांत शिंदे व माझ्या जिल्हा परिषद फंडातून कोट्यवधींची कामे केली आहेत, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुनिता कचरे यांनी केले.
पुसेगाव : पुसेगाव जिल्हा परिषद गटात पाच वर्षात आमदार शशिकांत शिंदे व माझ्या जिल्हा परिषद फंडातून कोट्यवधींची कामे केली आहेत, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुनिता कचरे यांनी केले.
पुसेगाव जिल्हा परिषद गटातील राजापूर येथे स्मशानभूमीच्या संरक्षण भित व सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजेंद्र घाटगे होते. यावेळी. मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र कचरे, सरपंच वनिता पवार, उपसरपंच रविंद्र घनवट, ग्रामपंचायत सदस्य निलेश घनवट, सुनिता घनवट, सविता घनवट, नारायण घनवट, शिवाजी घनवट, जिजाबा घनवट, माजी सरपंच संपत मदने, रामदास डंगारे, बाळासाहेब घनवट, नागू घनवट, जिजाबा मारुती घनवट व ग्रामस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता घनवट यांच्या फंडारून स्मशानभूमी संरक्षण भिंत 6 लाख रुपये, जराबी येथे बंदिस्त गटर 3लाख, हनुमान नगर येथील जिल्हा परिपदेच्या शाळेची दुरुस्ती 3 लाख, व सातपुतेवस्ती येथील अंगणवाडी शौचालय 3 लाख अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सौ. कचरे पुढे म्हणाल्या की, आमदार शशिकांत शिंदे यांच्या आशिर्वादाने. पुसेगाव गटाने मला जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधीत्व करण्याची संघी दिली. जनतेच्या प्रेमामुळे पुसेगाव गटातील समस्या व विकासाबाबत आवाज उठवून नेहमीच लोकहिताची कामे मार्गी लावली. भविष्यात मतदार संघाचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास व्यक्त केला. तसेच. पुसेगाव गट नेहमीच आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहिला असून माझ्यावरही गटातील जनतेने विश्वास दाखविला आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या साथीमुळे मी महिला असूनही समाजकार्य करीत आहे. गावच्या विकासासाठी लोकांनी एकोप्याने नेहमीच आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.
याप्रसंगी माजी सरपंच राजेंद्र घाटगे, राजेंद्र कचरे, नारायण घनवट यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी घनवट यांनी केले, तर आभार निलेश घनवट यांनी मानले.