राजवाडा बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांसमवेत असणारे रामदासांचे वादग्रस्त शिल्प प्रशासनाने तातडीने हटवावे अशी मागणी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनधिकृत शिल्पांची पोलिसांच्या उपस्थितीत उद़घाटने होतातच कशी ? प्रशासनाची या प्रकरणाला फूस आहे काय ? असा सवाल कोकाटे यांनी केला.
कराड : मलकापूर, ता. कराड येथे घराच्या शेजारी लावलेल्या रिक्षावर ओरखडे ओढल्याचा राग मनात धरून लहान मुलीसह तिच्या आईला दगड मारून जखमी केले. सोमवारी 20 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी नयना युवराज गाडे (वय 28) रा. संस्कृती सिटी, मलकापूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अक्षय संजय कांबळे रा. जगदाळे मळा, मलकापूर असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आह...
तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करुन १ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना वाई येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. भारत कमलाकर जाधव, वय २७, रा. प्रतापगंज पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
वाई शहरातील दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर वाईस सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती शाळांच्या आवारात मुलांची आणि काळजी घेण्याचे आवाहन वाई च्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने देखील केले होते या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, पण बेपत्ता झालेली ही दोन मुले पैसे संपल्यावर पनवेल मध्ये सापडली.
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्याना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एका वर्षा करीता सातारा व सांगली जिह्यातून हद्दपार केले आहे.
सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे आज येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक लोकार्पण करून त्यांच्या शिल्पावर दुग्धाभिषेक केला. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यासह बारा जणांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील सुरवडी गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील रस्ता अंत्यत खराब झाला होता. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुरावा करण्यात आल्यानंतर खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून सोमवारी या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यामुळे सुरवडी पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील रंगकर्मींचे हक्काचे स्थान असलेल्या शाहू कला मंदिराची तिसरी घंटा आज सायंकाळी वाजणार आहे. नुतनीकरणासह हे कलामंदिर नाट्यप्रयोग व कार्यक्रमांसाठी सज्ज झाले असून या नवीन वास्तूचा शुभारंभ सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी 22 रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.