महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

शेरेत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

शेरे ता. कराड येथे युवकाने राहत्या घरात फॅनच्या हुकाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. शुभम अशोक सातपुते (वय 22) रा. शेरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवार १९ रोजी दुपारी 4.30 सुमारास उघडकीस ही घटना आली.

esahas.com
महाराष्ट्र

उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्यावर कालव्याच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने लिंब आवळीमाथा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत लक्ष्मण सावंत असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून अज्ञात ट्रॅक्टरचालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर प्रतिमहिना तीस हजार रुपयांचा परतावा देण्याची हमी दिल्यानंतर परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुंबईतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बाळशिराम हाडवळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

61 हजारांचा ऐवज असलेल्या बॅगची चोरी; अज्ञातावर गुन्हा

सातारा येथील साई अमृत हॉस्पिटलच्या टेरेसवरुन साहित्य असलेल्या बॅगची चोरी झाली असून यामध्ये 61 हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या बॅगेत सोन्या, चांदीचा ऐवज असल्याचे समोर आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मी श्रेयवादात पडणार नाही : आ. शशिकांत शिंदे

पुसेगाव : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना १३४ कोटी मंजूर केले. नेर तलाव्यात नुकतेच पाणी आले. त्या पाण्याचे पूजन भल्या पहाटेच करून मी'च पाणी आणले असल्याचा कांगावा करून श्रेय घेण्याचा केविलवाण प्रयत्न केला. मी या श्रेयवादात पडणार नसून येणाऱ्या काळात उत्तर खटावच्या भागात जिहे - कठापूरचे पाणी शेतकऱ्यांना पोहचवून दुष्काळी भागा...

esahas.com
महाराष्ट्र

पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर घाण केल्यास मालकाला होणार 500 रूपये दंड

येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नगरपालिकेकडून 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आम्ही विकासाची नारळं फोडली, पण तुम्ही तर...

साताऱ्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवेंद्रराजें'च्या टिकेला उदयनराजें'नी सडेतोड उत्तर देत टीका केली.

esahas.com
महाराष्ट्र

खा. उदयनराजे भोसले यांनी मानले आरोग्य राज्य मंत्री ना. सौ. भारती पाटील यांचे आभार

100 जागांच्या मान्यतेसह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रीयेस आपण दिलेल्या मान्यतेबाबत आपले विशेष आभार, कोरोनाच्या काळातच आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सामान्य व्यक्तींची झालेली ससेहोलपट आपण जवळून पाहिली आहे. अनुभव फार मोठा शिक्षक आहे.

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्याची राजधानी असणाऱ्या बेंगलूरूमध्ये अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रासह मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पडसाद उमटले.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या मासिक पासामध्ये 135 रूपयांची वाढ

पुणे- बंगळुरू अशियाई महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील टोल प्लाझाच्या 20 कि. मी. परिसरात मासिक पासाचा सध्याचा दर 285 रूपये असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली. यापूर्वी मासिक पास 150 रूपयांना दिला जात होता, आता त्यामध्ये 135 रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे.