सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या कोयना अभयारण्यात मुंबईहून आलेल्या पर्यटकांना अस्वलाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांना मोठा आनंद झाला. दरम्यान, त्याच्या दर्शनाने त्या अभयारण्यातील अस्वलाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी एक मानवी कवटी आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळात ही कवटी गायब झाल्याने या कवटीचे वृत्त निराधार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु शुक्रवारी पुन्हा ही कवटी रूग्णालयाच्या आवारात आढळल्याने कवटी नक्की कोणाची हे तपासण्याचे आव्हान शहर पोलीसांपुढे निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी मकर संक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली. ओमायक्रॉनच्या संसर्गातही संक्रातीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
राजाराम महाराज हे जेवढे शांत आणि गंभीर होते तेवढेच ते मुत्सद्दी आणि पराक्रमी देखील होते. स्वराज्य संकटात असताना राजाराम महाराजांनी ते खऱ्या अर्थाने सावरले.
सातारा तहसिल कार्यालय परिसरात अनेक दिवसापासून फासेपारधी समाजातील काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. याबाबतीत प्रशासन अनभिज्ञ आहे, ही एक शोकांकिता आहे, या समाजाचे पुर्नवसन करण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जात असताना सातारा जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासिन का आहे ? हे मात्र समजून येत नाही : महारुद्र तिकुंडे, संस्थापक-अध्यक्ष , युवाराज्य फौंडेशन
सातारा तहसिल कार्यालय परिसरात अनेक दिवसापासून फासेपारधी समाजातील काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. याबाबतीत प्रशासन अनभिज्ञ आहे, ही एक शोकांकिता आहे, या समाजाचे पुर्नवसन करण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जात असताना सातारा जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासिन का आहे ? हे मात्र समजून येत नाही : महारुद्र तिकुंडे, संस्थापक-अध्यक्ष , युवाराज्य फौंडेशन
गेल्या काही वर्षात फलटणमधील संघटीत गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. अपवादात्मक घटना वगळता फलटण शांत होते. मात्र, बुधवारी पुन्हा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर फलटणमध्ये डोक्याला ताप होणारच, खून होणारच अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज असल्याची आजच्या घडीला तमाम फलटणकरांमध्ये भावना आहे.
विज बिल चोरी व थकित असणाऱ्या साताऱ्यातील चार उद्योजकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण करण्यात आले. अपहरण झाल्याची घटना समोर येताच संबंधित मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची तक्रार दाखल केली. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
महाविद्यालयातील सतरा वर्षीय तरुणीवर एका युवकाने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना सातारा शहरात उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला तत्काळ ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित आरोपी हा सतरा वर्षाचा असून तो कोरेगाव तालुक्यातील राहणार आहे. याबाबच्या गुन्ह्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.