maharashtra

महाराष्ट्रीयन कलाकारांवरील अन्याय सहन करणार नाही

अभिनेते किरण माने यांच्या हकालपट्टी प्रकरणी गृहराज्यमंत्री यांचा इशारा

Injustice against Maharashtrian artists will not be tolerated
महाराष्ट्रच्या बाहेरच्या चॅनेलने आमच्या कलाकारांवर अन्याय केला तर तो आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी अभिनेते किरण माने यांना मूलगी झाली हो या मालिकेतून एका वाहिनीने बेदखल केल्यानंतर दिला आहे. देसाईंनी अभिनेते किरण माने यांनी त्या संदर्भात तक्रार केल्यास निश्चित आम्ही चॅनेलवर कार्यवाहीचे आदेश देऊ, असे स्पष्ट केले.

सातारा : महाराष्ट्रच्या बाहेरच्या चॅनेलने आमच्या कलाकारांवर अन्याय केला तर तो आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी अभिनेते किरण माने यांना मूलगी झाली हो या मालिकेतून एका वाहिनीने बेदखल केल्यानंतर दिला आहे. देसाईंनी अभिनेते किरण माने यांनी त्या संदर्भात तक्रार केल्यास निश्चित आम्ही चॅनेलवर कार्यवाहीचे आदेश देऊ, असे स्पष्ट केले.
‘मुलगी झाली हो’ या मराठी मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आल्यानंतर राज्यातील जनता समाज माध्यमातून माने यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. जनतेबरोबरच राज्यातील नेते देखील किरण माने यांना पाठींबा दर्शवित आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन त्यांचे परखड मत व्यक्त केले आहे.