injusticeagainstmaharashtrianartistswillnotbetolerated

esahas.com

महाराष्ट्रीयन कलाकारांवरील अन्याय सहन करणार नाही

महाराष्ट्रच्या बाहेरच्या चॅनेलने आमच्या कलाकारांवर अन्याय केला तर तो आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी अभिनेते किरण माने यांना मूलगी झाली हो या मालिकेतून एका वाहिनीने बेदखल केल्यानंतर दिला आहे. देसाईंनी अभिनेते किरण माने यांनी त्या संदर्भात तक्रार केल्यास निश्चित आम्ही चॅनेलवर कार्यवाहीचे आदेश देऊ, असे स्पष्ट केले.