खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वडूज : खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाची वेगवान पद्धतीने लाट सुरू झाली असून रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर खटाव तालुक्यातच उपचार होणे गरजेचे आहे. सध्या वडूज ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर बंद आहे, यंत्रसामग्री धूळखात पडून आहे, त्याच्या देखभाल दुरूस्ती कडे संबधित यंत्रणेचे लक्ष नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या सेंटरचा वापर होत नसल्याने कोरोनाचे अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .तसेच महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार करणे सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.कोरोना प्रादुर्भावा मूळे अनेक लोकांचे रोजगार गेल्याने लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
वडूज ता खटाव येथील जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करावे व रुग्णांना आधार द्यावा अशी मागणी मनसेचे सुरज लोहार यांच्यासह मनसे कार्यकर्त्यानी खटाव तालुक्यातून प्रथम केली आहे. हे सेंटर सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांना त्याकाळी मोफत नाष्टा देऊन लोहार व मित्र मंडळाने माणुसकी जपली होती. त्याचीही यानिमित्त आठवण करून देण्यात आली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना मनसेचे मंगेश पवार, महेश देसाई, हणमंत पवार, अविनाश लोहार, निलेश लोहार आदीसह मनसे सैनिक उपस्थित होते.