खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील विवाहितेचा छळ करत तिच्या चारित्र्यावरुन संशय घेत मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंद असा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेश अनभुले, अलका अनभुले, रुपम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
सातारा : खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील विवाहितेचा छळ करत तिच्या चारित्र्यावरुन संशय घेत मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंद असा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेश अनभुले, अलका अनभुले, रुपम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत सातारा पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, जाखणगाव येथील प्रियांका अनभुले (रा. जाखणगाव, ता. खटाव, जि. सातारा. सध्या रा. १९६, गुरुवार पेठ, सातारा) यांचा विवाह २0१९ मध्ये महेश अनभुले याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पती महेशने दारु पिऊन प्रियांकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. 'तू सासरी येवू नकोस. तुझा सांभाळ करणार नाही. तु घरात पाय ठेवून बघ मग तुला बघतो. तुला आयुष्यभर असेच कुजवत ठेवणार आहे,' असे वारंवार बोलून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली. सासू अलका अनभुले (रा. जाखणगाव, ता. खटाव) आणि नणंद रुपम जाधव (रा. मंगळवार तळे, चिमणपुरा पेठ, सातारा) हिने प्रियांका यांच्या चारित्र्यावर संशय घेत 'तू माहेरुन पैसे आण,' असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार २0१९ ते दि. २९ नोव्हेंबर २0२१ या कालावधीत जाखणगाव आणि सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात घडला असल्याचेही प्रियांका अनभुले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अधित तपास पोलीस हवालदार मुंगसे करत आहेत.


