maharashtra

भुरकवडी येथे अटल भूजल योजना ग्रामस्तरीय शिबीर संपन्न


Atal Bhujal Yojana village level camp held at Bhurakwadi
केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील ७ जिल्हयामध्ये राबविली जात असून सातारा जिल्हयातील खटाव, माण व वाई तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या खटाव तालुक्यातून या ग्रामस्तरीय शिबिराचा प्रारंभ झाला झाला असून खटाव तालुक्यातून या योजनेत ३२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अटल भूजल योजनेचे कनिष्ठ भू वैज्ञानिक एम. एम. गडकरी यांनी भुरकवडी ता. खटाव येथे संपन्न झालेल्या अटल भूजल योजनेच्या शिबीरावेळी दिली.

खटाव : केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील ७ जिल्हयामध्ये राबविली जात असून सातारा जिल्हयातील खटाव, माण व वाई तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या खटाव तालुक्यातून या ग्रामस्तरीय शिबिराचा प्रारंभ झाला झाला असून खटाव तालुक्यातून या योजनेत ३२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अटल भूजल योजनेचे कनिष्ठ भू वैज्ञानिक एम. एम. गडकरी यांनी भुरकवडी ता. खटाव येथे संपन्न झालेल्या अटल भूजल योजनेच्या शिबीरावेळी दिली.
यावेळी शिबिरास कृषीतज्ञ प्रियंका थोरात, वैभव सोनवणे, अमोल खाडे, सरपंच ललीता कदम, मा. सरपंच शिवाजीराव कदम, एस के कदम सर, सोसायटीचे मा.अध्यक्ष शरदराव कदम, विजयदत्त कदम, सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, ग्रामसेविका धनश्री गमरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
अटल भूजल योजना शिबिरात एम एम गडकरी व प्रियंका थोरात यांनी अटल भूजल योजनेची उद्धिष्टये मध्ये पाणी बचतीचा उपाययोजना, जलपूनर्भरण व्यवस्थापन, शाश्वत भूजल विकासासाठी गावपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था तयार करणे, सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करून सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे आदि विषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरास ग्रा प सदस्या शितल कदम, मनिषा कदम, रेश्मा कदम, सुजाता गाढवे, सुलोचना कुंभार, छगन कदम, किरण कदम, शिवाजी जाधव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका आदिसह ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.