atalbhujalyojanavillagelevelcampheldatbhurakwadi

esahas.com

भुरकवडी येथे अटल भूजल योजना ग्रामस्तरीय शिबीर संपन्न

केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील ७ जिल्हयामध्ये राबविली जात असून सातारा जिल्हयातील खटाव, माण व वाई तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या खटाव तालुक्यातून या ग्रामस्तरीय शिबिराचा प्रारंभ झाला झाला असून खटाव तालुक्यातून या योजनेत ३२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अटल भूजल योजनेचे कनिष्ठ भू वैज्ञानिक एम. एम. गडकरी यांनी भुरकवडी ता. खटाव येथे संपन्न झालेल्या अटल भूजल योजनेच्या शिबीरावेळी दिली.