महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

जुगार अड्डयावर कारवाई

येथील मोळाचा ओढा परिसरातील एका दुकानाच्या आडोशाला जुगार सुरु होता. याबाबतची माहिती स्थानिकांकडून मिळताच या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून तिघांवर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून दोन हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आला आहेे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा तालुक्यात संसर्ग दर दुप्पटीवर

सातारा पंचायत समितीमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने मुख्य दरवाजाला कुलूप लावून सभागृहात ऑफलाईन सभा घेतल्याने पाच पेक्षा जास्त जण एकत्र येण्याच्या नियमाला हरताळ फासला गेल्याची चर्चा सुरु होती.

esahas.com
महाराष्ट्र

आरोग्य उपसंचालकांनी घेतली कवटी प्रकरणाची दखल

जिल्हा रुग्णालय परिसरात मानवी कवटी सापडल्या च्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली असून आरोग्य उपसंचालक डॉ संजोत कदम यांनी कवटी प्रकरणाचा खुलासा मागणारा ई-मेल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांना पाठवला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पुसेगांव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायद्याचे वाजले बारा आणि पोलिस अधिकारी म्हणतात माझी तुंबडी भरा?

कित्येक वर्षे या पुसेगांव पोलिस स्टेशनला दयानंद ढोमे, नंदकुमार पिंजण, विश्वजीत घोडके सारखे कर्तव्य कठोर व क्रियाशील पोलीस निरिक्षक भेटलेला नाहीत, त्यामुळे गेली 10/15 वर्षे व त्यानंतर आलेले (अपवाद वगळता) सर्व कारभारी फक्त पाट्या टाकणारे, निष्क्रिय, बेजबाबदार आणि वरकमाईकडे कल असणारेच अज्ञानी सहाय्यक पोलीस निरिक्षक होवून गेले.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हे

तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मजूर जखमी

सातारा तालुक्यातील वर्ये येथील लिंबखिंडकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर असणाऱ्या चहाच्या टपरीचर चहा पिताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मजूर जखमी झाला. दरम्यान, या ट्रॅक्टरच्या धडकेत एका दुचाकीचाही चेंदामेंदा झाला आहे. याप्रकरणी जखमी मजूराच्या पत्नीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कृष्णानगर येथून १३ हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी

सातारा येथील कृष्णानगर वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीच्या क्वॉर्टर्समधून १३ हजार रुपयांच्या लोंखडी साहित्याची चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या प्रभावाची रिपाइंच्या नेत्यांना भीती

महाराष्ट्रामध्ये यांच्या विचारांचा वारसा सांगणारा एकही रिपब्लिकन पक्ष उरलेला नाही. प्रत्येक गटाच्या नेत्याने पक्षाच्या नावाखाली स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न चालविला आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या उत्कर्षाची वाटचाल सुरू आहे. त्याचा प्रसार सातारा जिल्ह्यात केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादीचे काकासाहेब खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

...तर जिथं असाल तिथं गाठून...

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे संस्‍थापक खासदार शरद पवार हे देशातील थोर नेते आहेत. त्‍यांच्‍यावर टीका करण्‍याएवढी तुमची उंची नसून कर्मवीरांनी स्‍थापलेल्‍या रयत शिक्षण संस्‍थेचा इतिहास आणि त्‍यातील पवार कुटुंबीयांच्या योगदानाची माहिती घेण्‍याचा सल्‍ला फलटण येथील राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते सुभाष शिंदे यांनी पत्रकाद्वारे आमदार महेश शिंदे यांना दिला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वडिलांचा खुन केल्या प्रकरणी मुलास जन्मठेप

फलटण तालुक्यातील साठेफाटा येथे वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेप, पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. शामसुंदर नारायण इंगळे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.