विज बिल चोरी व थकित असणाऱ्या साताऱ्यातील चार उद्योजकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.
सातारा : विज बिल चोरी व थकित असणाऱ्या साताऱ्यातील चार उद्योजकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये मे शिवराज इंटरपाईजेस आणि गणेश इंटरप्राईजेस या दोन कंपन्या आहेत. या कंपनीतील बाळकृष्ण साहेबराव जाधव व निलेश माळी या उद्योजकांनी २०२० पासून एकूण पंधरा महिन्यांचे ४७ लाख ८६ हजार ३३० रुपयांचे वीज चोरी देयक उद्योजक बाळकृष्ण जाधव यांनी स्वीकारले. परंतु दिलेले वीज बिल त्यांनी अद्यापपर्यंत भरले नाही. त्यामुळे वीज वितरणचे अधिकारी मोहन लोखंडे (वय ४६, रा. आकुर्डी पुणे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तर दुसरी तक्रार वीज वितरणाच्या महिला अधिकारी उज्वला लोखंडे (वय ४६, रा. पुणे) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार साताऱ्यातील नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये मे फार्म मशनरी अँड इक्विपमेंट ही कंपनी आहे. या कंपनीतील उद्योजक विजय शिंदे आणि देवानंद शिंदे यांनी पंधरा महिन्यांचे वीज चोरी बिल २९ लाख २० हजार ५०० रुपयांचे अद्यापपर्यंत भरले नाही. हे बिल गोविंद चव्हाण यांनी स्वीकारले. मात्र वीज बिल भरण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचे समोर आल्यानंतर या उद्योजकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात बिल भरण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


