येथील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण करण्यात आले. अपहरण झाल्याची घटना समोर येताच संबंधित मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची तक्रार दाखल केली. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
सातारा : येथील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण करण्यात आले. अपहरण झाल्याची घटना समोर येताच संबंधित मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची तक्रार दाखल केली. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरून एक महाविद्यालयीन युवती अचानकपणे गायब झाली. ही युवती तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून गेली आहे. मात्र, ती परत न आल्याने तिच्या पालकांनी तिच्या फोनवर फोन केला. त्यावेळी ही मुलगी अज्ञात युवकासोबत असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीच्या आईने यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरी घटनाही सातारा शहरातील महाविद्यालयाच्या आवारात घडली आहे. १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाते, असे सांगून गेली होती. ती कॉलेजच्या परिसरातून गायब झाली असल्याचे मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणाचा सातारा शहर पोलीस तपास करत असून मुलींचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. त्यानंतरच या मुली नेमक्या कुठे आहेत, हे समोर येणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.