महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन युवतीवर मामाचा बलात्कार

अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मामाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. वाई तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या एका गावात हि घटना घडली.

esahas.com
महाराष्ट्र

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; सहाजण गंभीर

पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

esahas.com
महाराष्ट्र

रेठरे खुर्दमध्ये हार्वेस्टर मशीनखाली सापडून शेतकर्‍याचा मृत्यू

रेठरे खुर्द, ता. कराड येथे हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊसतोड सुरु असताना मशीनखाली सापडून शेतकर्‍याचा मृत्यू झाला. गुरुवारी 3 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या कांड्या गोळा करताना ही घटना घडली. संभाजी शंकर पाटील (वय 45) रा. रेठरे खुर्द ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कराडात धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील चेन लांबवली  

येथील आझाद चौकात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. गुरुवारी ३ रोजी दुपारी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेला चोरटा नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

esahas.com
महाराष्ट्र

भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेस मारहाण

पती व पत्नी यांच्यामध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या आशा महेश गुरव (वय 41 रा. करंजेनाका सातारा) यांना मारहाण केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

रस्त्याने जाण्यास अडवणूक केल्याने दोन गटात मारामारी

वाढे, ता. सातारा या गावात राहत असलेले प्रमोद रामचंद्र नलवडे (वय 51) हे रस्त्याने जात असताना याच गावातील नलवडे कुटुंबातील सदस्यांनी अडवणूक करून मारहाण केल्याने परस्पर विरोधी तक्रारी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

esahas.com
महाराष्ट्र

केवायसी अपडेट करतो असे भासवून दीड लाखाची फसवणूक

केवायसी अपडेट करून देतो, असे भासवत अज्ञात चोरट्याने सिकंदर बाबुलाल मुलाणी (वय 34, मुळ रा. वडी ता. खटाव) यांच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढून दीड लाखांची फसवणूक केली आहे. अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या असून वारंवार पोलीसांकडून आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला जखमी

सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील चार घटनांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू  झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पंडित ऑटोमोटिव्ह च्या लिलाव प्रक्रियेला कर्मचारी संघटनेची हरकत

पंडित ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालमत्ता आणि जागा याचा लिलाव आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. तो अत्यंत बेकायदेशीर स्वरूपाचा आहे. या प्रक्रियेला कामगार संघटनेने उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह सर्विसेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.