केवायसी अपडेट करून देतो, असे भासवत अज्ञात चोरट्याने सिकंदर बाबुलाल मुलाणी (वय 34, मुळ रा. वडी ता. खटाव) यांच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढून दीड लाखांची फसवणूक केली आहे. अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या असून वारंवार पोलीसांकडून आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सातारा : केवायसी अपडेट करून देतो, असे भासवत अज्ञात चोरट्याने सिकंदर बाबुलाल मुलाणी (वय 34, मुळ रा. वडी ता. खटाव) यांच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढून दीड लाखांची फसवणूक केली आहे. अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या असून वारंवार पोलीसांकडून आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सिकंदर मुलाणी हे एमआयडीसी परिसरातून घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने दि. 1 रोजी च्या 6.30 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास केवायसी अपडेट करून देतो, असे भासवून बॅकेची माहिती काढून खाते नंबर घेतला. आणि याच खात्यातून वेळोवेळी रक्कम ऑनलाईन काढून घेतली. जवळपास त्यांच्या खात्यातून 1 लाख 55 हजार 500 रूपये ट्रान्सफर झाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे सिकंदर यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक श्रीसुंदर करत आहेत.


