maharashtra

रस्त्याने जाण्यास अडवणूक केल्याने दोन गटात मारामारी

परस्पर विरोधी तक्रारी दाखल : अद्याप कोणालाही अटक नाही

Fighting in two groups over roadblocks
वाढे, ता. सातारा या गावात राहत असलेले प्रमोद रामचंद्र नलवडे (वय 51) हे रस्त्याने जात असताना याच गावातील नलवडे कुटुंबातील सदस्यांनी अडवणूक करून मारहाण केल्याने परस्पर विरोधी तक्रारी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

सातारा : वाढे, ता. सातारा या गावात राहत असलेले प्रमोद रामचंद्र नलवडे (वय 51) हे रस्त्याने जात असताना याच गावातील नलवडे कुटुंबातील सदस्यांनी अडवणूक करून मारहाण केल्याने परस्पर विरोधी तक्रारी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, वाढे गावात राहत असलेले प्रमोद रामचंद्र नलवडे हे दि. 1 रोजी 9.15 वाजण्याच्या सुमारास गावातून पाया चालत निघाले होते. यावेळी मोहीम प्रकाश नलवडे याने प्रमोद याना अडवून हा रस्ता माझ्या बापाचा आहे. असे म्हणून दांडक्याने मारहाण करायला सुरूवात केली. हे पाहून गणेश सतिश नलवडे, दिलीप कुंडलिक नलवडे, रमेश नलवडे, अशोक नलवडे, संदेश दिनकर नलवडे, राजेंद्र नलवडे, उद्देश दिलीप नलवडे, रजत नलवडे(सर्व रा. वाढे ता. सातारा) यांनी प्रमोद यांची पत्नी जयश्री, मुलगा श्रेयस व भावजय सुषमा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रजत हा मुलगा शेयस यांच्या अंगावर तलवार घेवून मारायला धावून आला. या 9 जणांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर या प्रकरणात फिर्यादी प्रमोद नलवडे यांनी दारू पिऊन मोहीम नलवडे यांच्या घरी जावून रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, अशी विचारणा करून त्यांना व पत्नी, मुलगा आई यांना शिवीगाळ केल्याने यांच्यासह श्रेयस नलवडे, सुनिल नलवडे, राजेंद्र नलवडे, बजरंग नलवडे, ऋषिकेश नलवडे, सुरेश नलवडे, शोभा नलवडे, सुषमा नलवडे, वनिता नलवडे (सर्व रा. वाढे ता. सातारा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.