महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

पालखी महामार्गाचे काम बंद पडल्यास सतीश धुमाळ जबाबदार

आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गासाठी भोगवटादार वर्ग - १ शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई बँकेत जमा केल्यानंतर क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ आणि त्यांच्या कार्यालयाकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे १० टक्के रक्कम कपातीबाबतचे पत्र बँकेस देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. 

esahas.com
महाराष्ट्र

प्लास्टिक पिशवी वापराबाबत बेकरी चालकास दंड

नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शुक्रवारी ११ रोजी शहरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत अन्य दुकानदारांना पालिकेच्या पथकाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

१९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज थकवून परस्पर ट्रकची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे

१९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज  थकवून परस्पर ट्रकची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अब्दुल कादिर सय्यद, रा. सुपा, ता. पुरंदर, जि. पुणे आणि अमोल ननावरे रा. सातारा अशी त्यांची नावे आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथून दोन दुचाकींची चोरी

गडकर आळी आणि देवी चौक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

नविआच्या नगरसेवकांसह तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सातारा शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्‍याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्‍यात सातारा पालिकेचे नगरसेवक रविंद्र निवृत्ती ढोणे (वय ४३, रा. रामाचा गोट, सातारा) यांच्‍यासह तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्‍याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रासिटीतंर्गत) गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. रविंद्र ढोणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

करंजे गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी

करंजे, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून ग्रामस्थांनी हटकल्यानंतर युवकांनी पलायन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने हाणामारी करणाऱ्या इसमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. जे. पतंगे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

नगर भूमापन अधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई चा ठपका

नगर भुमापनं अधिकाऱ्याच्या कामकाजावर भुमी अधिक्षक कार्यालयाने कर्तव्य कसुरीचा ठपका ठेवला आहे. नागरिकांकडून वारंवार प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची चौकशी करणेकामी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे महसूल विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

यादोगोपाळ पेठेत ई-श्रम कार्ड नोंदणी सप्ताह

सातारा येथील पोस्ट ऑफिस सातारा जिल्हा व माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील यादोगोपाळ पेठेत असंघटीत महिला व पुरुष कामगारांसाठी डाकघर भारत विभाग श्रम मंत्रालय केंद्र सरकार व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत समाजातील 24 प्रकारच्या असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड विशेष नोंदणी सप्ताह सुरू करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्गावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.

esahas.com
महाराष्ट्र

'निर्भया'ने दिले गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना 'गुड टच, बॅड टच'चे धडे

सातारा जिल्हा पोलीस व गुरुकुल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने सातारा शहरात निर्भय निर्भया फलक उभारण्यात आले आहेत. गुरुकुल शाळा परिसरातील निर्भया पथक फलकाचे अनावरण सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात आली आहे.