maharashtra

केंजळ येथे छ. शिवाजी महाराजांचा अनाधिकृतपणे पुतळा बसविल्याप्रकरणी ३६ तरुणांवर गुन्हा


Crime against 36 youths for unauthorized installation of statue of Chh. Shivaji Maharaj
केंजळ (ता.वाई) येथे १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भैरवनाथ मंदिरासमोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वाई : केंजळ (ता.वाई) येथे १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भैरवनाथ मंदिरासमोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान वाई पोलिस आणि महसूल प्रशासनाने केंजळ गावात मोठ्या प्रमाणात पोलिस फौज फाटा तैनात करुन गावाची शांतता आबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले व बसवलेल्या अनाधिकृत पुतळ्याची पाहणी करून क्षणार्धात पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले. पुतळा परिसरात दिवसभर हजारो तरुणांचा जमाव उपस्थित होता.
त्या जमावाला तात्काळ पुतळा परिसर रिकामे करण्याचे आदेश देऊन रात्री उशीरा अथक परिश्रम घेऊन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत अखेर तो पुतळा काढुन भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी तो ताब्यात घेऊन जप्त करुन तो पोलिस ठाण्यात जमा केला. हा अनाधिकृत पुतळा बसवणाऱ्या ३६ जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चंदन संकपाळ, संकेत राजेंद्र येवले, अमीत कदम, गुरु कदम, सागर सुनील कदम, ओंकार बाबर, वरुण जंगम, अक्षय ऊर्फ पप्यु जगताप, आकाश बोबडे, शंतनु जगताप, संकेत चौधरी,  आशिष जगताप, अभिजीत जगताप, प्रतिक विकास मोहिते, अनील जगताप, विपुल कदम, राहुल माने, गोट्या जगताप, संकेत जगताप, दर्शन हणमंत कदम, शैलेश कदम, शंतनु कदम, आदित्य बाबर, आदित्य चौधरी, अनिकेत जाधव, (सर्व राहणार शेंदुरजणे) मोन्या संकपाळ, रणजित जमदाडे, सुमीत चव्हाण, बंटी जाधव, समीर जाधव, प्रेम येवले, तुषार जगताप, अभी कदम, आदित्य चौधरी, संकेत रामदास गोळे (सर्व राहणार गोळेवाडी, ता.खंडाळा), रुतेश प्रताप शिंदे तसेच त्यांना मदत करणारी इतर लोक यांचा समावेश आहे.
या ३६ जणांनी सातारा जिल्ह्यामध्ये १२ फेब्रुवारी रोजी रात्री या कालावधीत जमावबंदी आदेश असताना भंग केला. कट करुन बेकायदेशीर जमाव जमवून देशामध्ये कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव व संसर्ग असताना साथीचे रोग पसरतील हे माहित असताना समांतर अंतर न ठेवता सार्वजनीक बांधकाम विभाग खात्याची केंजळ येथील दर्शनी जागेमध्ये विद्रुपीकरण केले.
कोणत्याही खात्याची परवानगी न घेता जनसमाजात तेढ निर्माण व्हावी हा हेतुने छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृतपणे पुतळा उभारून त्यांचे पावित्र्य भंग केले म्हणून वरील ३६ आरोपी विरुद्ध भुईंज पोलिस ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल सचिन सूर्यकांत नलवडे यांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत.