maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा


Crime in one of the cases that led to death
चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरून स्वतःच्या कारच्या नुकसानीस जबाबदार ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरून स्वतःच्या कारच्या नुकसानीस जबाबदार ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास चिंचणी गावच्या हद्दीत दत्तनगर वसाहती जवळ असलेल्या पुलाजवळ सुनिल सिताराम वेलकर, रा. घोटवड, ता. माणगाव, जि. रायगड, याने आपल्या ताब्यातील ब्रिझा कार क्रमांक एमएच ०३- डीए ४९८५ मधून आई-वडिलांना उपचारा करता इस्लामपूर येथे घेऊन जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार चालवत असताना कारचा टायर फुटून कार पलटी झाली. यामध्ये कारमध्ये पाठीमागील सीटवर बसलेले नरेश हरिनाम जाधव रा. घोटवड, ता. माणगाव यांच्या मृत्यूस कारणीभूत करून कारच्या नुकसानीस जबाबदार ठरल्या प्रकरणी पोलीस नाईक मालोजीराव चव्हाण यांनी त्याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.