सध्या सातारा-टेभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुसेगांव गावठाणातून चालू आहे. त्यामुळे रस्ता खोदलेला असल्याने, वाहतुकीस रस्ता उपलब्ध होत नसल्याने 10ते 12 दिवस पुसेगाव हद्दीतील वाहतुक वळवण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राम जाधव यांनी केली आहे.
पुसेगाव : सध्या सातारा-टेभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुसेगांव गावठाणातून चालू आहे. त्यामुळे रस्ता खोदलेला असल्याने, वाहतुकीस रस्ता उपलब्ध होत नसल्याने 10ते 12 दिवस पुसेगाव हद्दीतील वाहतुक वळवण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राम जाधव यांनी केली आहे.
पुसेगाव येथील सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त ज्याप्रमाणे या गावाच्या हद्दीतील वाहतुक व्यवस्था वळवली जाते, त्याच प्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे काम गावठाण हद्दीतील होईपर्यत वाहतुक नेर फाटा-विसापूर फाटा -खातुगुण फाटा-कटगुण फाटा-,ललगुण फाटा-राजापूर -कुळकजाई फाटा- चौकीचा आंबा या वेगवेगळ्या जोड फाटेवरुन पुढील 10-15 दिवस वाहतुक व्यवस्था वळवण्यात यावी. जेणेकरून राष्ट्रीय महामार्गाचे काम पुसेगांव गावठाण हद्दीतील लवकरात लवकर पुर्ण करता येईल. तसेच S.T स्टॕड चौक ते पोलिस स्टेशन-मारूती मंदीर काॕर्नर -सेवागिरी मंदीर-येरळा नदी पर्यत वाहतुक कोडी होवून वाहतुक व्यवस्था पण ठप्प होत आहे. तरी वाहतुक कोंडी या प्रश्नाचा महसुल प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
अवजड मालवाहतुक, ट्रक, ट्रेक्टर -ट्रेलर्स, जेसीबी, ST बस, कंटेनर्स वगैरे पुसेगाव गावात प्रवेश न करता अन्यत्र मार्गाने वाहतुक व्यवस्था वळवण्यात यावी, म्हणजे वाहतुकीची कोंडी होणार नाही.