maharashtra

अनुकंपाधारक उमेदवारांचे सातारा येथे आमरण उपोषण सुरू


Compassionate candidates start fast-unto-death at Satara
कराड, वाई आणि सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी या मागणीसाठी अनुकंपाधारक उमेदवारांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सातारा : कराड, वाई आणि सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी या मागणीसाठी अनुकंपाधारक उमेदवारांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नाशिकमध्ये १७५ उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती दिल्या गेल्या आहेत. परंतु सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या नियुक्‍त्या केल्या गेल्या नाहीत. कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला दिवसाला ६०० रुपये तर महिन्याला १८ हजार रुपये पगार मिळतो. यामध्ये ८ ते ९ हजार रुपये अधिकारांना खायला मिळतात. आम्ही सर्वजण गेल्या १५ वर्षापासून अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळेल या अपेक्षेने वाट पाहत आहोत. आमच्यापैकी अनेक जणांची नोकरीची वय उलटून गेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा आम्हाला नियुक्त्या देण्याबाबत निर्णय होत नाही. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची ही वारंवार भेट घेतली असून ते याबाबत काहीही करू शकले नाहीत. सातारा जिल्ह्यातील संबंधित उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे शासनाने अधिकार देऊन सुद्धा आमची नियुक्ती केली जात नाही.
दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी आम्ही एक निवेदन दिले होते. सामूहिक आमरण उपोषणही केले होते. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दि. २६ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत किंवा जानेवारी महिन्यामध्ये सर्वांच्या नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनामुळे उपोषण बंद केले मात्र त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. सातारा जिल्ह्यातील फलटण म्हसवड महाबळेश्वर येथे अनुकंपा धारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत मात्र वाई, कराड आणि सातारा येथील उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. त्यामुळे आम्ही आमरण उपोषण करीत असून दि. १७ फेब्रुवारी रोजी सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे.