maharashtra

खासगी सावकारी प्रकरणी तिघांवर गुन्हा


Three charged in private lending case
खासगी सावकारी प्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सातारा : खासगी सावकारी प्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ फेब्रुवारी रोजी अलंकार कॉलनी, दौलतनगर, करंजे, ता. सातारा येथील पोपट सुभाष पाटील, वय ३५ यांच्या घरी त्यांची पत्नी एकटी असताना सुरेंद्र परसराम शिंदे, राहणार सोनगाव सं निंब, ता. सातारा  आणि उदय भाऊसाहेब राठोड, रा. क्षेत्रमाहुली, सातारा व एक अनोळखी इसम यांनी व्याजाने घेतलेल्या १ लाख २० हजार रुपये आजचे आज पाहिजे. तुझा नवरा हरमखोर कुठे आहे ते सांग. त्याने पैसे दिले नाही तर त्याला जिवंत ठेवत नाही असे म्हणून तो घरी परत येईपर्यंत तुमच्या घरासमोर हलणार नाही, असे म्हणत शिवीगाळ दमदाटी त्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.