माण - खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमंत दिक्षीत यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.
खासगी सावकारी प्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरून स्वतःच्या कारच्या नुकसानीस जबाबदार ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका खासगी कंपनीतील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करीत चौघांकडून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना अटक करण्यात आली आहे.
कराड, वाई आणि सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी या मागणीसाठी अनुकंपाधारक उमेदवारांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सध्या सातारा-टेभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुसेगांव गावठाणातून चालू आहे. त्यामुळे रस्ता खोदलेला असल्याने, वाहतुकीस रस्ता उपलब्ध होत नसल्याने 10ते 12 दिवस पुसेगाव हद्दीतील वाहतुक वळवण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राम जाधव यांनी केली आहे.
तीन पैशाचा कडीपत्ता सरकार झालं बेपत्ता, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देत जिल्हा परिषदेवर सातारा जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियनच्यावतीने लाटणे मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नगरोत्थान अंतर्गत एक रुपयाचा निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव असे प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
२ कोटी ६५ लाख रुपये किमतीच्या २४ वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणातील इतर वाहने शोधण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई ' संस्थेला यश आले. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत म्हसवे (डी मार्ट जवळ,ता. सातारा) येथे या वटवृक्ष सोबत अनोखा 'व्हलेंटाईन डे' साजरा करण्यात आला.