वाईच्या एमआयडीसी मधील गरवारे वालरुप्स कंपनीच्या नेट प्रोसेस विभागात सौ.छाया संतोष बोधे (वय ३५, रा. रविवार पेठ, वाई) यांचा मशीनच्या दोरी मध्ये पाय अडकल्याने व त्या मशीनला वेग असल्याने दोरीसोबत त्या जमीनीपासून २० फुट ऊंचीवर असलेल्या मशीनमध्ये क्षणार्धात ओढल्या गेल्या. त्यांचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील भूविकास बँकेच्या चौकात शिवजयंती चे बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने एक युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या युवकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
लोकांच्या हितासाठी काम करण्याची आमची एक पध्दत आहे. आमची धडाडी व लोकप्रियता खुपणाऱ्यांकडून आमच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. सहकारात स्वाहाकार करणारे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा घणाघाती शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आरोपांना नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मलकापूर नगरपालिकेचे सन २०२२-२३ या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही कर वाढ न करता नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
अवर्षण, अतिवृष्टी, भारनियमन इत्यादी परिस्थितीमध्ये महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही वेळोवेळी काम करतो. मात्र ठेकेदारांची बिले सहा-सहा महिने प्रलंबित राहतात. त्यामुळे आम्हाला प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसात निर्णय न झाल्यास आम्ही सर्व कामे बंद करू, असा इशारा सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पाटण विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या अडीअडचणी जाग्यावरच सोडविण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
काजारवाडी ते गोटेवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाच्या कामासाठी ४ वर्ष अविरतपणे पाठपुरावा सुरू होता. हे काम करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत निधी पोहचवत विकास केला आहे. बाबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत दक्षिणेत अनेक कामे केली असून यापुढेही आणखी कामे करू, असे मत इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित , सातारा पंचवार्षिक निवडकीचे सर्व जागा बिनविरोध झाल्या असून श्री. शिवनाथ जगन्नाथ मुळे यांची सलग सहाव्यांदा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे मूळ रा. मारुल, ता.कराड, सातारा हे अखेर १३ दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस अधिकारी गायब झाल्याने महाराष्ट्र पोलिस दल हादरुन गेला. या दरम्यान, शिरवळ येथे ताटे सापडले असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
केंजळ (ता.वाई) येथे १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भैरवनाथ मंदिरासमोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.